मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (13:24 IST)

कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये येऊ शकते,आरोग्य मंत्रालयाला मुलांची काळजी वाटत आहे

केंद्रीय गृहमंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीने म्हटले आहे की,कोरोना विषाणूची तिसरी लाट (कोविड -19) ऑक्टोबरच्या आसपास शिगेला पोहोचू शकते.हे प्रौढांप्रमाणेच मुलांवर गंभीर परिणाम करू शकते.पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) सादर केलेल्या अहवालात,समिती डॉक्टर,कर्मचारी आणि व्हेंटिलेटर आणि रुग्णवाहिके सारख्या उपकरणासह बालरोगविषयक सुविधांच्या तीव्र गरजेबद्दल बोलले आहे. 

एका अहवालानुसार,एमएचएच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या (एनआयडीएम) अंतर्गत तज्ञांची समिती स्थापन करण्यात आली होती.अहवालात तज्ञांनी विषाणूविरूद्ध लसीकरण मोहिमांना इतर आजार असलेल्या मुलांसाठी आणि विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी प्राधान्य देण्याबद्दल देखील लिहिले आहे.

देशातील औषध नियामकांनी 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी झायडस कॅडीला च्या ZyCoV-D ची लस मंजूर केली आहे.ही मोहीम अद्याप सुरू झालेली नाही.यापूर्वी, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी संकेत दिले होते की सप्टेंबरपासून मुलांना विषाणूविरूद्ध लसीचे डोस मिळू शकतात.

झायडस कॅडिलाची प्रभाव क्षमता सुमारे 28,000 स्वयंसेवकांवर 66.6 टक्के होती.मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूविरूद्ध लढा देणारी ही पहिली प्लाझ्मा डीएनए लस आहे.यामध्ये विषाणूचे अनुवांशिक घटक वापरले जातात.ही माहिती डीएनए किंवा आरएनएला पाठवतात जेणेकरून प्रथिने तयार होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.झायडस कॅडिला लस बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे.या लसीच्या निर्मात्यांनी जुलै महिन्यात सांगितले होते की ही लस कोविड-19 च्या डेल्टा व्हेरियंट शी लढा देण्यास अत्यंत सक्षम आहे.