राज्यात आज 4,359 कोरोना रुग्णांची नोंद, 237 ओमायक्रॉन बाधित आढळले
राज्यात आज दिवसभरात 4,359 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी 237 रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहे. तर आज 12,986 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आले. आरोग्यविभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 78,39,447 एवढी झाली आहे. त्यापैकी 76 लाख 39 हजार 854 जण बरे झाले आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट 97.54 टक्के झाला आहे.
सध्या राज्यात 52,238 अक्टीव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे. राज्यात आज 32 रुग्ण मृत्युमुखी झाले आहे. आजवर 1 लाख 43 हजार 387 रुग्ण मृत्युमुखी झाले आहे. तर राज्याचा मृत्युदर 1.82 टक्के आहे. आता पर्यंत 7 कोटी 63 लाख 02 हजार 782 नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहे. राज्यात सध्या 2,387 जण संस्थात्मक क्वारंटाईन तर 3,13,457 जण होम क्वारंटाईन आहे.