मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 28 मे 2020 (09:33 IST)

आरोग्य सेतू अ‍ॅपसाठी बग बाउंटी प्रोग्राम

कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी सरकारने आरोग्य सेतू अ‍ॅपसाठी बग बाउंटी प्रोग्राम आणला आहे. कोविड-१९ संपर्क ट्रेसिंग अ‍ॅप आरोग्य सेतुचा सोर्स कोड देखील एनआयसीने जाहीर केला आहे, ज्याच्या मदतीने अॅपमध्ये त्रुटी शोधू शकता. वास्तविक, आरोग्य सेतु अ‍ॅपच्या सेफगार्डिंगवर अनेक तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले होते, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. बग्स, त्रुटी आणि चांगल्या कोडचा अहवाल देणाऱ्यांना सरकार रोख बक्षिसेही देणार आहे.
 
आरोग्य सेतु अॅपच्या अँड्रॉइड व्हर्जनचा सोर्स कोड सरकारने सामायिक केला आहे. सुमारे ९८ टक्के वापरकर्ते अँड्रॉइड अ‍ॅप वापरत आहेत. तथापि, लवकरच आरोग्य सेतुच्या iOS आणि KaiOS आवृत्त्यांचा स्त्रोत कोड देखील सामायिक केला जाईल. या अ‍ॅपच्या अँड्रॉइड व्हर्जनचा सोर्स कोड गीटहबवर लाइव्ह आहे आणि नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटरने (एनआयसी) बग-बाऊंटी प्रोग्राम देखील जाहीर केला आहे. या कोडच्या मदतीने संशोधक अ‍ॅप सुधारण्यास मदत करतील. या निर्णयाचे संशोधकांनी स्वागत केले आहे.