गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 25 डिसेंबर 2021 (08:19 IST)

नगर जिल्ह्यात ओमिक्रोनचा आणखी एक रुग्ण आढळला

अहमदनगर जिल्ह्यातील ओमायक्रॉन रुग्णसंख्येत आता वाढ झाली आहे, जिल्ह्यात एकाच दिवशी एकूण दोन रुग्ण आढळले आहेत. आईसोबतच सहा वर्षांच्या मुलालाही बाधा झाल्याचे निष्पन्न आहे.
नायजेरियातून श्रीरामपूरला परतल्यानंतर झालेल्या तपासणीत संसर्ग आढळून आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ही महिला व तिचा मुलगा नायजेरिया येथून आले होते.
तेव्हाच आरोग्य विभागातर्फे या दोघांचेही नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्या दोघांचे अहवाल आले, महिलेवर श्रीरामपूरमधीलच एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, जगभरात ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यानंतर, आता नगर जिल्ह्यात रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.ज्या टॅक्सीमधून ते आले होते, त्या चालकासह त्यांच्या संपर्कात आलेल्या दहा जणांची तपासणी करण्यात आली होती. या सर्वांचे करोना चाचणीचे अहवाल मात्र निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.