शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 डिसेंबर 2021 (09:46 IST)

Omicron News :महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा उद्रेक

राज्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने आपले खरे रूप दाखवण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचे 1179 नवीन रुग्ण आढळले असून त्यापैकी 23 प्रकरणे ओमिक्रॉनचे आहेत. यापैकी 13 प्रकरणे पुणे जिल्ह्यात, 5 मुंबई, दोन उस्मानाबाद आणि प्रत्येकी एक ठाणे, नागपूर आणि मीरा भाईंदरमध्ये आढळून आली आहेत. याशिवाय राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेल्या 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने सांगितले की, राज्यात एकूण बाधितांची संख्या 66,53,345  झाली आहे. मृतांची एकूण संख्या 1,41,392 वर पोहोचली आहे.
गुरुवारी, एकाच दिवसात ओमिक्रॉनची सर्वाधिक 23 प्रकरणे नोंदवली गेली. राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या आता 88 झाली आहे. बुधवारी ओमिक्रॉन  चे एकही रुग्ण आढळले नाही. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 7,897 आहे. गेल्या 24 तासांत 615 लोक बरे झाले आहेत. कोविड-19 साठी दिवसभरात सुमारे 1,10,997 नमुने तपासण्यात आले .
कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे आणि ओमिक्रॉनचा धोका पाहता अनेक राज्यांमध्ये निर्बंध लागू झाले आहेत. ख्रिसमस आणि नवीन वर्षात लग्न समारंभ, हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकार आज तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे.