सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 23 डिसेंबर 2021 (11:10 IST)

शाळेत करोना स्फोट; 29 विद्यार्थ्यांना संसर्गाची लागण

कोरोना विषाणूने पुन्हा जोर पकडला आहे. दररोज नवीन प्रकरणे वेगाने समोर येत आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील एका निवासी शाळेतील किमान 29 विद्यार्थ्यांमध्ये कोरोना विषाणूची पुष्टी झाली आहे. एका अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, जवाहर नवोदय विद्यालय, कल्याणीच्या इयत्ता 9वी आणि 10वीच्या 29 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे.
 
अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर विद्यार्थिनींच्या पालकांना घरी घेऊन जाण्यासाठी कळवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संक्रमित विद्यार्थ्यांना खोकला आणि सर्दीची लक्षणे असल्याने त्यांना होम आयसोलेशनचा सल्ला देण्यात आला आहे. कल्याणी उपविभागीय अधिकारी (एसडीओ) हिरक मंडळ म्हणाले की, शाळेतील इतर विद्यार्थी आणि शिक्षकांचीही कोविड-19 साठी तपासणी केली जात आहे. अहवाल आल्यानंतर अधिक माहिती दिली जाईल.
 
विशेष म्हणजे, गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 6317 नवे रुग्ण आढळले आहेत. ही संख्या कालच्या तुलनेत 18.6 टक्क्यांनी अधिक आहे. यासह, सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 78,190 आहे. भारतातील पुनर्प्राप्ती दर सध्या 98.40% आहे. गेल्या 24 तासांत 6,906 लोक बरे झाले आहेत. आता बरे झालेल्यांची एकूण संख्या 34201966 झाली आहे. त्याच वेळी, गेल्या 24 तासांत 318 लोकांचा मृत्यू झाला आहे.