सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 21 डिसेंबर 2021 (09:32 IST)

राज्यात 544 नवे कोरोना मात्र ओमिक्रॉनचा नवीन एकही रूग्ण नाही

महाराष्ट्रात सोमवारी 544 नव्या कोरोना रूग्णांचं निदान झालं आहे. दिवसभरात चार मृत्यूंची नोंद झाली आहे.राज्याचा मृत्यू दर आजही 2.12 टक्के इतकाच आहे जो सातत्याने गेल्या काही महिन्यांपासून सारखाच आहे. दिवसभरात राज्यात 515 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 64 लाख 98 हजार 15 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.71 टक्के इतका झाला आहे.