रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: रविवार, 19 डिसेंबर 2021 (15:34 IST)

Omicron Variant: डेल्टा आणि ओमिक्रॉन मिळून बनेल ओमिक्रोन चा नवा सुपर व्हेरियंट - शास्त्रज्ञांचा इशारा

गेल्या एका वर्षात जगभरात कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटने प्रचंड हाहाकार माजवला आहे. तथापि, कोरोनाच्या या स्वरूपाचा धोका कमी होताच, कोरोनाचे अधिक अत्याधुनिक रूप 'ओमिक्रॉन व्हेरिएंट' देखील जग व्यापू लागले आहे. दक्षिण आफ्रिकेनंतर, ब्रिटन, युरोप आणि अमेरिकेत या नवीन व्हेरियंट ची लागण झालेल्या लोकांची संख्या सातत्याने वाढत आहे. शास्त्रज्ञांनी याबाबत संशोधन सुरू केले होते की आता त्यांना एक नवीन भितीदायक प्रश्न सतावू लागला आहे. 
 
अलीकडे, जेव्हा डॉ पॉल बर्टन, लस कंपनी मॉडर्नाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) यांना विचारले गेले की डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरियंट एकत्रितपणे नवीन विकसित व्हेरियंटला जन्म देऊ शकतात का, तेव्हा ते म्हणाले की हे शक्य आहे. या आठवड्यात ब्रिटीश संसदेच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीसमोर सादरीकरणादरम्यान, डॉ बर्टन म्हणाले की कोरोनाच्या दोन्ही धोकादायक व्हेरियंट चे संयोजन (डेल्टा आणि ओमिक्रॉन) एक अतिशय प्राणघातक सुपर वेरिएंट तयार करण्याचा धोका आहे. हा व्हेरियंट अस्तित्वात येऊ शकतो जेव्हा एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी अस्तित्वात असलेल्या दोन्ही प्रकारांचा संसर्ग होतो. 
डॉ बर्टन म्हणाले- "याविषयी डेटा आहे. दक्षिण आफ्रिकेतून याविषयी काही अहवाल ही प्रकाशित झाले आहेत, ज्यात असे म्हटले आहे की कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना दोन प्रकारच्या विषाणूची लागण झालेली आढळू शकते." "डेल्टा आणि ओमिक्रॉनची प्रकरणे यूकेमध्ये पसरली असल्याने, अशा परिस्थिती नवीन व्हेरियंट जन्माला येण्याचा धोका लक्षणीय वाढू शकतो," 
 
एक दिवसापूर्वी ब्रिटनमध्ये कोरोनाचे 93 हजार नवीन रुग्ण आढळले आहेत. ज्या लोकांचे जीनोम सिक्वेन्सिंग केले जाऊ शकते त्यापैकी तीन हजारांहून अधिक लोकांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळले. यामुळे, यूकेमध्ये सध्या ओमिक्रॉनची जवळपास 15 हजार प्रकरणे आहेत. तथापि, शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की जीनोम सिक्वेन्सिंगच्या मर्यादित क्षमतेमुळे, ओमिक्रॉनचा प्रसार अचूकपणे शोधणे कठीण आहे. 
डॉ बर्टन यांनी  सांगितले की हे शक्य आहे की दोन स्ट्रेन त्यांच्या जनुकांची अदलाबदल करू शकतात आणि धोकादायक प्रकार निर्माण करू शकतात. संशोधकांचा असा विश्वास आहे की त्याची अपेक्षा खूपच कमी आहे, परंतु जर कोरोनाला संधी मिळाली तर याची शक्यता देखील असू शकते.