शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (09:47 IST)

संशोधनात मोठा खुलासा, ओमिक्रॉन व्हेरियंट 70 पट वेगाने पसरतो

एका अभ्यासानुसार, कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन व्हेरियंट डेल्टा आणि मूळ कोविड-19 स्ट्रेनपेक्षा70 पट वेगाने संक्रमित होतो, परंतु रोगाची तीव्रता खूपच कमी असण्याची शक्यता आहे.
 
कोरोनाचे ओमिक्रॉन व्हेरियंट जगभरातील आरोग्य संस्था आणि शास्त्रज्ञांसाठी गंभीर चिंतेचे कारण बनले आहे. आतापर्यंत केलेल्या अभ्यासात, शास्त्रज्ञ या व्हेरियंट ला संसर्गजन्य मानत आहेत, याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की अनेक देशांमध्ये, ओमिक्रॉन व्हेरियंट ने पुन्हा लॉकडाउन सारखी परिस्थिती निर्माण केली आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की सर्व लोकांना ओमिक्रॉन व्हेरियंट पासून संरक्षण करण्यासाठी विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, जे पूर्णपणे लसीकरण केलेल्या लोकांना देखील संक्रमित करू शकते.
 
दरम्यान, ओमिक्रॉन व्हेरियंटची संसर्गजन्यता आणि तीव्रतेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या पथकाने एक मोठा खुलासा केला आहे. अभ्यासानुसार, कोरोनाचे ओमिक्रॉन व्हेरियंट डेल्टा आणि मूळ कोविड-19 स्ट्रेनपेक्षा 70 पट वेगाने संसर्ग पसरवू शकते, जरी हा रोग होण्याचा धोका कमी असल्याचे दिसून आले आहे. अभ्यासात, शास्त्रज्ञांनी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे की या नवीन व्हेरियंट मुळे शरीराच्या कोणत्या भागांवर अधिक परिणाम होऊ शकतो

अभ्यासानुसार, ओमिक्रॉन एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत वेगाने पसरतो परंतु फुफ्फुसाच्या ऊतींना त्याच्या पूर्वीच्या प्रकारां इतके नुकसान होत नाही."अनेक लोकांना संक्रमित करून, एक अतिशय संसर्गजन्य विषाणू अधिक गंभीर आजार आणि मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो,  
अनेक आरोग्य तज्ञ आणि WHO लोकांना सावधगिरी बाळगण्याचा आणि गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहण्याचा, योग्य प्रकारे मास्क लावण्याचा आणि स्वच्छतेची  काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे .