1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (08:49 IST)

२५ ओमिक्रॉनबाधित रिकव्हर होऊन घरी गेले राज्यासाठी दिलासादायक

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील देखील ओमिक्रॉन रुग्णांची सातत्याने वाढ होताना दिसत आहे. पण  राज्यात ओमिक्रॉनच्या एका रुग्णाची नोंद झाली आहे. तसेच २५ ओमिक्रॉनबाधित रिकव्हर होऊन घरी गेले आहेत. ही राज्यासाठी दिलासादायक बाब आहे.
 
काल, बुधवारी राज्यात ४ नव्या ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आणि एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या ३२वर पोहोचली. मात्र आज एकही ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच या ३२ ओमिक्रॉनबाधित रुग्णांपैकी २५ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या राज्यात ७ ओमिक्रॉनबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
 
आतापर्यंत कुठे, किती ओमिक्रॉनबाधित आढळले होते?
मुंबई – १३ रुग्ण
पिंपरी चिंचवड -१० रुग्ण
पुणे मनपा -२ रुग्ण
कल्याण डोंबिवली – १ रुग्ण
नागपूर -१ रुग्ण
लातूर -१ रुग्ण
वसई विरार – १ रुग्ण
उस्मानाबाद – २ रुग्ण
बुलढाणा- १ रुग्ण