मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (08:23 IST)

चारित्र्यावर संशय घेऊन कोयत्याने पत्नीच्या डोक्‍यात वार…

Suspicious of his character
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर सात मधील पूर्णवादनगर भागात राहणाऱ्या गोपाल शंकर पाटील याने त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मासे कापण्याच्या कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,गोपाळ शंकर पाटील याने त्याची पत्नी लक्ष्मी पाटील,वय 40 वर्ष,व्यवसाय -घरकाम हिच्यासोबत चारित्र्यावर संशय घेऊन वाद घातले. हे वाद टोकाला जाऊन आरोपी गोपाल पाटील याने घरातील मासे कापण्याच्या कोयत्याने त्याची पत्नी लक्ष्मीच्या डोक्यावर व पायावर वार करून तिला गंभीर रित्या जखमी केले.तसेच लाथाबुक्क्यांनी हाणमार करून घाण घाण शिव्या देऊन तिला ठार मारण्याचा प्रयत्न देखील केला.
या घटनेवरून गोपाळची पत्नी लक्ष्मी पाटील यांच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 846/2021 प्रमाणे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा काल बुधवारी दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास करत असताना तपासी अधिकारी पीएसआय सुरवाडे यांनी पोलीस निरीक्षक श्री संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली काल दुपारच्या सुमारास आरोपी गोपाल पाटील याला तात्काळ अटक देखील केली आहे.या घटनेने पूर्णवादनगर व बजरंगनगर भागात खळबळ माजली आहे.