मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 20 डिसेंबर 2021 (09:37 IST)

राज्यात ९०२ नवीन कोरोनाबाधित प्रकरणे, तर ९ जणांचा मृत्यू

902 new coronavirus cases in the state
राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसात सातत्याने चढउतार पाहिला मिळतोय. रविवारी  राज्यात ९०२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला.तर  ७६७ जणांना कोरोनावर मात केली आहे. राज्यात रिकव्हरी रेट ९७.७१ टक्के इतका झाला आहे.
 
कोरोनाच्या पहिल्या लाटेत डिसेंबर महिना कोरना रुग्णसंख्या वाढीच्या दृष्टीने धोक्याचा ठरला होता. कमी झालेली रुग्णसंख्या डिसेंबरमध्ये वाढू लागली आणि दुसरी लाट फोफावली होती. आता पुन्हा एकदा दुसऱ्या लाटेत कमी झालेली रुग्णसंख्या डिसेंबरमध्ये वाढू लागल्याची चिन्ही दिसत आहेत.
 
मुंबईत कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत कमालीची घट झाली होती. १ डिसेंबरला मुंबईत १०८ रुग्ण सापडले होते. पण त्यानंतरच्या १५ दिवसात रुग्णसंख्या वाढत असून ३०० पार गेली आहे. मुंबईत गेल्या चोवीस तासात ३३६ रुग्ण सापडले आहेत. तर २०१ जण बरे होऊन घरी परतले. मुंबईत सध्या विविध रुग्णालयात २०८१ रुग्ण उपचार घेत आहेत. तर मुंबईचा रिकव्हरी रेट ९७ टक्के इतका आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी २२८८ इतका झाला आहे.