शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (08:36 IST)

चिंता वाढली : केपटाऊनहून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून डोंबिवलीत आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे. त्यामुळे राज्यात ओमिक्रॉन व्हेरियंटने  शिरकाव केला आहे का हे प्रवासी रुग्णाचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जात  आहे.
दरम्यान, प्रवासी रुग्णाला महापालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. रुग्णाच्या भावाची देखील कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्याच्या कुटुंबाची तपासणी केली जाणार असल्याचे महापालिकेच्या विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले. प्रवासी रुग्ण हा २४ तारीखला दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन मधून दिल्लीला आला. या प्रवाशाची दिल्ली विमानतळावर कोरोना चाचणी करण्यात आली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.