मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (23:49 IST)

राज्यात पुन्हा कोरोनाचा स्फोट, नवीन रुग्णांची संख्या 43 हजारांच्या पुढे; ओमिक्रॉनची 238 नवीन प्रकरणे

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या काळात महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा स्फोट  झाला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 43 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. याशिवाय 19 मृत्यूची नोंद झाली आहे. याशिवाय , राज्यात ओमिक्रॉनची 238 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 लाख 61 हजारांच्या पुढे गेली आहे.
शुक्रवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 43211 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 33356 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशाप्रकारे, आता राज्यात कोरोनाचे 261658 रुग्ण सक्रिय आहेत. याशिवाय शुक्रवारी मुंबई शहरात 11,317 नवीन कोविड-19 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. राज्यात एकूण 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, एकट्या मुंबईत नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
बीएमसीने आपल्या आरोग्य बुलेटिनमध्ये म्हटले आहे की पॉझिटिव्ह आढळलेल्या 84 टक्के रुग्ण लक्षणे नसलेले होते. महाराष्ट्रात ओमिक्रॉनची 238 नवीन प्रकरणे आहेत. राज्यात ओमिक्रॉनचा आकडा 1605 वर पोहोचला आहे.  
 मुंबई पोलिसांनी माहिती दिली की, गेल्या 24 तासांत 136 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 126 जवानांचा मृत्यू झाला आहे.एकूण  सक्रिय प्रकरणे 1,253 आहेत.