शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 ऑक्टोबर 2021 (09:57 IST)

राज्यात 3,139 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

राज्यात कोरोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत गुरुवारी घट झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची  संख्या देखील आज वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या कमी आहे. त्यामुळे राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात गुरुवारी कोरोनाचे  2,219 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 3,139 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
 
राज्यात आतापर्यंत 64 लाख 11 हजार 075 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  97.38 टक्के आहे. तसेच 49 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 39 हजार 670 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर  2.12 टक्के इतका झाला आहे.
 
सध्या राज्यात 29 हजार 555 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 05 लाख 46 हजार 572 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 83 हजार 896 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 32 हजार 261 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 1,122 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.