शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 5 नोव्हेंबर 2020 (08:53 IST)

राज्यात कोरोना रिकव्हरी रेट ९० पॉईंट ६८ टक्के

Corona recovery
राज्यात बुधवारी नव्याने ५ हजार ५०५ कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. तर १२५ मृत्यू जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ हजार ७२८ कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात कोरोना रिकव्हरी रेट ९० पॉईंट ६८ टक्के आहे. सध्या १,१२,९१२ रुग्णांवर उपचार सुरु आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. 
 
राज्यातील एकूण रुग्णसंख्या १७ लाखांच्या घरात पोहोचली आहे. सध्या १ लाख १२ हजार ९१२ रुग्णांवर प्रत्यक्षात उपचार सुरू आहेत. दरम्यान, कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत आहे, ही एक आनंदाची बातमी आहे. 
 
राज्यात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या राज्यातील रिकव्हरी रेट ९०.६८ टक्के इतके असून नवीन बाधित रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा आकडा मोठा आहे. राज्यातील आजची स्थिती पाहिल्यास गेल्या २४ तासांत ५ हजार ५०५ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर त्याचवेळी ८ हजार ७२८ रुग्ण कोरोनावर मात करत ठणठणीत होत घरी  गेले आहेत. 
 
राज्यात आतापर्यंत १५ लाख ४० हजार रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. कोरोनाची साथ आल्यापासून आतापर्यंत एकूण ९१ लाख ८५ हजार ८३८ करोना चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यात १६ लाख ९८ हजार १९८ चाचण्यांचे ( १८.४९ टक्के ) अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या १३ लाख ३५ हजार ६८१ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर ११ हजार ६४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.