पौरोहित्य करणाऱ्यांवरही कोरोनाचे सावट…!  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  चीन देशात उदयास आलेल्या कोरोना व्हायरसचा हाहाकार सगळीकडेच माजलेला आहे, त्याचा कहर आपल्याला सर्वत्रच बघावयास मिळत आहे. कोरोना व्हायरसचा फटका शेतीव्यवसाय, व्यापारी वर्ग, उद्योगधंदे, शाळा, महाविद्यालये या सर्वांनाच बसत आहे, त्याचबरोबर पौरोहित्य करणाऱ्या ब्राम्हण वर्गालाही कोरोनाचा जोरदार फटका बसतांना बघावयास मिळत आहे. दक्षिण गंगा असलेल्या गोदावरी नदी काठी अनेक विधी होतात मात्र ते आता बंद झाले आहेत. तर तुम्बकेश्वर येथे देखील तसाच प्रकार झाला आहे.
				  													
						
																							
									  
	 
	कोरोना व्हायरसला भारतात थैमान घालून बरेच दिवस झाले. आणि कोरोना व्हायरस ला आळा बसावा म्हणून खबरदारी म्हणून भारतात जमावबंदी कायदा ही लागू करण्यात आला आहे. तसेच 21 दिवसाचे लॉकडाऊन करण्यात आले होते आणि तेच लॉकडाऊन आता 3 तारखेपर्यंत कायम करण्यात आले आहे, ह्याच सर्व कारणांमुळे ह्या काळात कोणतेही धार्मिक कार्य करायला परवानगी नसल्याने पौरोहित्य करणाऱ्या काही ब्राम्हण वर्गाला मात्र खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. पौरोहित्य करूनच पोटाची खळगी भरत असणाऱ्या काही ब्राह्मण समाजाच्या पुढे मात्र पोटापाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
				  				  
	 
	कोरोना व्हायरसमुळे लग्न, वास्तुशांती, साखरपुडा इत्यादी अशा सर्वच धार्मिक कार्यक्रमांना विघ्न आलेले आहे आणि त्यामुळे सर्वच कार्यक्रम रद्द देखील करण्यात येत आहे. त्यामुळेच ह्यामुळेच काही ब्राह्मण वर्गाला चांगल्याच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पूजापाठ करूनच आर्थिक कमाईतून घर चालवणाऱ्या काही ब्राह्मण वर्गाच्या समोर मात्र मोठा पेच निर्माण झाला आहे. कोरोनाचे सावट लवकरात लवकर दूर होईल अशी आशा पौरोहित्य करणाऱ्या सर्वच ब्राह्मण समाजाकडून व्यक्त करण्यात येत आहे.