मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 3 मे 2021 (22:57 IST)

राज्यात कोरोना मंदावला 50 हजारांपेक्षा कमी केसेस

Corona slowdown in the state less than 50 thousand cases
महाराष्ट्रात लॉकडाऊन दरम्यान कोरोनाचा वेग कमी होऊ लागला आहे. राज्यात सलग दुसर्‍या दिवशी 50 हजारांहून कमी नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, रिकव्हरी वाढण्यासह सक्रिय प्रकरणे देखील कमी होऊ लागली आहे.  मुंबईतही कोरोनाची प्रकरणे झपाट्याने कमी होत आहेत. महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात 48,621 नवीन प्रकरणे समोर आली असून 567 लोक मृत्युमुखी झाले आहेत.  
महाराष्ट्रात चोवीस तासांत 59,500 लोक बरे झाले आहे.सक्रिय प्रकरणे कमी होऊन 6,56,870 एवढे आहे .
आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही म्हटले आहे की महाराष्ट्रात संसर्ग कमी होण्याची चिन्हे आहेत. राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे कमी होत आहेत.
 
त्याच वेळी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 2,662 नवीन प्रकरणे नोंदविण्यात आली. 5,746 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला, तर 78 लोक मृत्युमुखी झाले आहेत. मुंबईत सध्या 54,143 सक्रिय प्रकरणे आहेत.