संबंधित माहिती
- सोनिया गांधी पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह, घरी आयसोलेट, प्रियंका गांधींनाही 3 दिवसांपूर्वी लागण
- दिल्लीत पुन्हा मास्क घालणे बंधनकारक, उल्लंघन करणाऱ्यांना दंड
- Corona Update : महाराष्ट्रासह 7 राज्यात कोरोनाचा वेग वाढला
- दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाचा स्फोट, दोन हजारांहून अधिक नवे रुग्ण, 5 बाधितांचा मृत्यू
- Covid-19 Updates: दिल्लीत कोरोनाने पुन्हा वेग घेतला, 1100 हून अधिक प्रकरणे, संसर्ग दर 6.56%
Corona Update : मुंबईत आज 867 नवे कोरोना रुग्ण आढळले
मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली होती. त्यामुळे नागरिकांना कोरोनापासून दिलासा मिळाला होता.आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.आज मुंबईत दिवसभरात 867 नवे कोरोना रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे . मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णसंख्येत झालेली वाढ नागरिकांसाठी चिंतेची बाब बनली आहे.सध्या मुंबईत एकूण 4624 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1107419 वर पोहोचली आहे. तर कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा दर 97.9% एवढा झाला आहे. तसेच कोरोना दुप्पटीचा दर 1372 दिवसांवर पोहोचला आहे. दिलासादायक बातमी म्हणजे आज कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नाही.
