मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 21 मे 2020 (22:08 IST)

ज्यांना ताप नाही ते रूग्ण संसर्ग पसरू शकत नाही

ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत किंवा ज्यांना ताप नाही ते रूग्ण संसर्ग पसरू शकत नाही. अशा रुग्णांना सलग ३ दिवस ताप नसल्यास त्यांना १० दिवसानंतर डिस्चार्ज देता येईल. तसेच त्यापूर्वी त्यांची चाचणी करण्याचीही आवश्यकता नाही असे आरोग्य मंत्रालयाकडून असे सांगण्यात आले आहे.  मात्र अशा रूग्णांना डिस्चार्जनंतर ७ दिवस घरी आयसोलेट व्हावे लागेल. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात ६९% कोरोना रुग्ण बिनालक्षणं असणारे आढळलेले आहेत.
 
गेल्या २४ तासांत ५ हजार ७८९ नवीन रुग्ण आढळले. एका दिवसात तीन हजारांहून अधिक रूग्ण बरे झाले तर १३२ लोकांचा मृत्यू देखील झाला आहे. भारतात आता या जीवघेण्या व्हायरसचे १ लाख १२ हजार ३५९ रुग्ण आहेत. तसेत, ४५ हजार ३०० लोक या आजारावर मात करून बरे झाले आहेत. तर आतापर्यंत ३ हजार ४३५ लोकांनी आपला जीव गमावला आहे.