फडणवीसांच्या स्वीय सहाय्यकांना कोरोनाची लागण
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक तथा औशाचे विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. विलगीकरण कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांच्या घशात खवखव होत असल्याने त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. अहवालात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.