1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (14:20 IST)

मुलांसाठी Covaxin लशीला मान्यता, 'या' वयाच्या मुलांना मिळणार लस

Covaxin vaccine approved for children
भारतातील लसीकरण मोहिमेसंदर्भात सर्वात मोठी बातमी म्हणजे मुलांसाठी भारत बायोटेकच्या लसीला सरकारने मान्यता दिली आहे. ही लस 2 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनाही दिली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, या लसीच्या दोन डोसमध्ये 28 दिवसांचे अंतर ठेवावे लागेल. भारतात 2-18 वयोगटासाठी Covaxin लशीला मान्यता देण्यात आली आहे. 
 
DCGI ने Covaxin लशीला मान्यता दिली आहे. आता लवकरच देशात लहान मुलांचे कोरोना लसीकरण सुरू होऊ शकते. भारत बायोटेक आणि आयसीएमआरने मिळून ही लस विकसित केली आहे.
 
लवकरच केंद्र सरकार लहान मुलांच्या लसीकरणासंबंधित नियमावली जारी करणार आहे. काही महिन्यांपूर्वीच लहान मुलांवर कोवॅक्सीन (Covaxin) ची तपासणी केली जात होती. आतापर्यंत लशीची यशस्वीपणे चाचणीही झाली असल्याचे सूत्रांकडून समजते. या चाचणीदरम्यान लहान मुलांवर विपरित परिणान झाला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात 12 वर्षांवरील मुले आणि कोविड कंडिशन असलेल्या मुलांना प्राधान्य दिले जाईल.