सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 17 जानेवारी 2023 (14:39 IST)

Covid-19 :चीनमधील कोरोना व्हेरियंट BF.7 चे महाराष्ट्रात 3 रुग्ण आढळले

covid
सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ने चीन मध्ये उच्छाद मांडला आहे. कोरोनाच्या दिवसेंदिवस वाढत्या संसर्गाच्या प्रकरणामुळे दररोज हजारोव्यक्ती मृत्युमुखी होत आहे. 

कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. चीन मध्ये कोरोनाचा नवीन व्हेरियंट  BF.7 मुळे आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. चीन मध्ये आढळणाऱ्या कोरोनाचा नवीन व्हेरियंट BF.7 चा महाराष्ट्रात शिरकाव झाला असून या व्हेरियंटचे 3 रुग्ण मुंबईत आढळले आहे.या रुग्णांना सौम्य लक्षणे असून एकाला कोणतीही लक्षणे दिसली नाही.  

हे रुग्ण परदेशातून आले असून प्रथमच कोरोनाच्या या व्हेरियंटने बाधित आहे. मुंबईत कोरोनाच्या या नवीन व्हेरियंटचे 3 रुग्ण आढळल्यावर आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. तिघाना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले असून त्यांनी काही दिवसांपूर्वी चीनमध्ये प्रवास केला होता. त्यांची प्रकृती बरी असल्याचे सांगितले जात आहे. 
 
Edited By- Priya Dixit