चिंताजनक! कोरोनातच आता म्युकरमाक्रोसिस आजाराला सुरुवात

corona virus
Last Modified मंगळवार, 4 मे 2021 (08:20 IST)
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत नाकातील बुरशीजन्य (फंगसच्या) या नवीन आजाराने डोके वर काढले असून हा आजार झाल्यानंतर त्यावर वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे. उपचार वेळेत न घेतल्यास रूग्ण दगावण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे ज्या व्यक्तींना करोना झालेला आहे व मधुमेह देखील आहे अशा रूग्णांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे असे आवाहन इंदोरवाला इनटी इन्स्टिट्युटचे प्रसिध्द कान-नाक -घसा तज्ञ डॉ. शब्बीर इंदोरवाला यांनी केले.
डॉ. इंदोरवाला म्हणाले की, सध्या कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे त्यातच या म्युकरमाक्रोसिसच्या आजाराने थैमान घालायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत हा आजार नव्हता, मात्र दुसर्‍या लाटेत मधुमेही कोविड रूग्णांमध्ये हा आजार जाणवत आहे. हा आजार संसर्गजन्य आजार नसून मात्र वेळीच त्याचे निदान होऊन त्यावर उपचार अथवा शस्त्रक्रिया केल्यास रूग्ण कायमस्वरूपी बरा होऊ शकतो अथवा रूग्णांच्या जीवावरही बेतू शकतो, असेही डॉ. इंदोरवाला म्हणाले.
या आजाराच्या लक्षणांबाबत डॉ. इंदोरवाला म्हणाले की, कोरोना रूग्णाच्या चेहर्‍यावर डोळ्याला सुज येणे, दिसायला बंद होणे, श्‍वास घ्यायला त्रास होणे, डोकेदुखी, गिळायाला त्रास होणे अशी लक्षणे दिसतात. अशावेळी जवळच्या कान-नाक-घसा तज्ञांशी संपर्क साधून उपचार करणे गरजेचे आहे. अन्यथा आजार बळावून रूग्ण दगावण्याची शक्यता असते. कारण करोनाच्या आजारात जर १०० पैकी ५ टक्के रूग्णांमध्ये लक्षणे अधिक दिसून लोक दगावू शकतात. मात्र म्युकरमाक्रोसिस या आजारात शंभर पैकी शंभर लोकांना जर वेळेत उपचार मिळाले नाही तर आजार अधिक बळावू शकतो. अथवा रूग्णही दगावू शकतो, असे डॉ. इंदोरवाला यांनी स्पष्ट केले.
म्युकरमाक्रोसिस हा आजार ओळखायचा झाल्यास त्याचे मुख्य लक्षण म्हणजे नाकात बुरशीसारखा रक्तमिश्रीत चिकट श्राव येतो, हा त्रास डोळे व मेंदू पर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करून बुरशीजन्य भाग काढणे गरजेचे आहे.

या आजाराची लक्षणे दिसताच रूग्णांना आठ दिवस भरती करून ‘लापोजोमल एमफोटेरसिन बी’ या इंजेक्शनचे ९० ते १०० डोस घेणे गरजेचे आहे. परंतु ज्या रूग्णाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे अशा रूग्णांना ‘लापोजोमेल एमफोटेरसिन बी’ हे इंजेक्शन देऊनही आम्ही उपचार देतो. हे इंजेक्शन कमी दरात मिळते. त्यामुळे हा इंजेक्शनचा डोस घेणे गरजेचे आहे. ज्यामुळे या आजाराची पुनरावृत्ती होत नाही. अन्यथा शस्त्रक्रिया करून ही बुरशी काढणे गरजेचे आहे. अन्यथा रूग्ण दगावू शकतो.
या आजारापासून आपला बचाव करण्यासाठी नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस घ्यावी, उत्तम आहार घ्यावा, मधुमेह नियंत्रणात असावा आणि नियमित व्यायाम करावा, घाबरू नये असे आवाहन डॉ. शब्बीर इंदोरवाला, डॉ. अबुझर इंदोरवाला, डॉ. गौरी महाजन व इंदोरवाला हॉस्पीटलचे सीईओ युसूफ पंजाब यांनी केले आहे.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

गडकरी वाढदिवस साजरा करणार नाही, केले प्रसिद्धी पत्रक जारी

गडकरी वाढदिवस साजरा करणार नाही, केले प्रसिद्धी पत्रक जारी
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार घातला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील लाडके ...

रमजान ईदसाठी गृहविभागामार्फत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना ...

रमजान ईदसाठी गृहविभागामार्फत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जारी
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ’ब्रेक द चेन’ या आदेशान्वये कडक ...

मराठा आरक्षण, काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे केल्या १२

मराठा आरक्षण, काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे केल्या १२ मागण्या
मराठा समाजाला राज्य सरकारच्या अधिकारात असलेल्या बाबी तातडीने लागू करणे, ओबीसी समाजाने ...

सचिन वाजेची अखेर पोलिस खात्यातून हकालपट्टी

सचिन वाजेची अखेर पोलिस खात्यातून हकालपट्टी
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवल्याप्रकरणी तसेच या कारचा मालक मनसुख ...

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ड्राइव्ह इन’ लसीकरण केंद्र

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ड्राइव्ह इन’ लसीकरण केंद्र
ठाण्यात विवियाना मॉलच्या वाहनतळामध्ये महापालिका प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ड्राइव्ह ...