मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 30 जून 2021 (09:58 IST)

डेल्टा प्लस वेगाने पसरतोय; महाराष्ट्राला सर्वाधिक धोका

कोरोनाचा नवा व्हेरियंट  डेल्टा प्लस भारतात वेगाने पसरतोय. डेल्टा प्लसचे ६६ रुग्ण भारतात झाले असून त्यातील ३४ तर महाराष्ट्रातीलच आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता वाढलेली आहे. विशेष म्हणजे डेल्टा प्लसच्याच भितीने महाराष्ट्र सरकारने अचानक पुन्हा एकदा निर्बंध घातले आहेत. 
 
दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्येही डेल्टा प्लसचे संक्रमण असल्याची शंका व्यक्त होत आहे. पुणे येथील नॅशनल इन्स्टीट्यूट आफ व्हायरोलॉजी येथील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की महाराष्ट्रात नवे १४ रुग्ण डेल्टा प्लसचे आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या ३४ झाली आहे. याचप्रकारे मध्य प्रदेशातून तपासणीसाठी आलेल्या नमुन्यांमध्ये ३ डेल्टाचे रुग्ण असल्याचे आढळले आहेत.
 
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, ओडिसा, राजस्थान आणि जम्मू–काश्मिर याठिकाणी डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत. तर दिल्ली, हरियाणा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये या व्हेरियंटचे संक्रमण अद्याप आढळून आलेले नाही.