शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 12 जून 2021 (09:29 IST)

राज्यात ११ हजारांहून अधिक नव्या रूग्णांचे निदान

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी-जास्त होताना दिसतेय. गुरूवारी राज्यात  १२ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या तुलनेने शुक्रवारी कोरोना बाधितांची संख्या घटल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी ११ हजारांहून अधिक नव्या रूग्णांचे निदान झाले तर ४०६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.
 
दरम्यान, शुक्रवारी राज्यात ११,७६६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५८,८७,८५३ झाली आहे. यासह शुक्रवारी ८,१०४ रुग्ण बरे होऊन त्यांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ५६,१६,८५७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.४ टक्के एवढे झाले आहे. यासह सध्या राज्यातील मृत्यूदर १.८१ टक्के इतका आहे. तसेच आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,७६,११,००५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,८७,८५३ (१५.६५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,०४,७७० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,०२४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी नोंद झालेल्या एकूण ४०६ मृत्यूंपैकी २७३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १३३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या २२१३ ने वाढली आहे. हे २२१३ मृत्यू, पुणे-५४६, ठाणे-३९८, अहमदनगर-२९१, नाशिक-१९४, नागपूर-१६०, बीड-१२९, सातारा-५३, चंद्रपूर-४९, बुलढाणा-४६, नांदेड-४५, पालघर-४०, सांगली-३९, जालना-३४, रत्नागिरी-२८, यवतमाळ-२५, लातूर-२०, नंदूरबार-१८, रायगड-१४, भंडारा-११, अकोला-१०, परभणी-१०, गोंदिया-८, धुळे-६, जळगाव-६, औरंगाबाद-५, हिंगोली-५, उस्मानाबाद-५, सिंधुदुर्ग-५, सोलापूर-५, कोल्हापूर-४, अमरावती-२ आणि गडचिरोली-२ असे आहेत.