रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 7 एप्रिल 2020 (10:36 IST)

आपल्याकडूनही अशाच प्रकारच्या प्रतिसादाची अपेक्षा ठेवा : डोनाल्ड ट्रम्प

कोरोना विषाणू अमेरिकेत कहर करत आहे. अमेरिकेत दिवसागणीक सरासरी ५०० ते ६०० लोकांचे मृत्यू होत आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताकडून हायड्रॉक्सीक्लोरोक्विन अर्थात मलेरियावरील औषधाच्या मदतीची अपेक्षा केली आहे. रविवारी सकाळी मी पंतप्रधान मोदींशी या विषयावर चर्चा केली आहे. जर त्यांनी औषध पुरवठा करण्यास परवानगी दिली तर आम्ही त्यांच्या या निर्णयाचे कौतुक करू त्यांनी सहकार्य न केल्यास काही फरक पडत नाही. परंतु आपल्याकडूनही अशाच प्रकारच्या प्रतिसादाची अपेक्षा ठेवा, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
 
अमेरिकेत कोरोना विषाणूच्या संसर्गाचे ३ लाख ६७ हजार ४ रुग्ण आहेत. तर १० हजार ८७१ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोनाने अक्षरश: थैमान घातलं आहे. या विषाणूवर आजपर्यंत कोणताही उपचार सापडलेला नाही. आता अमेरिका आणि जगातील शास्त्रज्ञ या विषाणूविरूद्ध लस शोधण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत जेणेकरून लोकांचे जीव वाचू शकतील. या महामारीमुळे आतापर्यंत जगात ७४ हजार ६९७ लोक मरण पावले आहेत. त्याचवेळी १३ लाख ४६ हजार ५६६ जण संक्रमित आहेत.
 
ट्रम्प प्रशासन काही प्राथमिक निकालांच्या आधारे कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन वापरण्यावर भर देत आहे. हे औषध मलेरियाच्या उपचारांमध्ये अनेक दशकांपासून वापरले जाते. गेल्या शनिवारी अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने त्वरित मान्यता दिल्यामुळे, न्यूयॉर्कमध्ये अंदाजे १,५०० कोरोना रूग्णांवर मलेरियाचे औषध वापरुन उपचार केले जात आहेत. ट्रम्प यांच्या मते, औषधाचे सकारात्मक परिणाम आहेत.