शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 16 मार्च 2020 (12:20 IST)

मोदी-ठाकरे दरम्यान फोनवरून चर्चा?

महाराष्ट्रात सर्वाधिक 32 जणांना कोरोनाची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी केंद्राकडून सर्वोतोपरी सहाय्य करण्याचे  आश्वासनही त्यांनी दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांमध्ये काल बोलणे झाले. सुमारे पंधरा मिनिटे या दोघांमध्ये बोलणे झाल्याचे सांगणत येते. यावेळी मोदींनी राज्यातील कोरोनाची लागण झालेले रुग्ण, संशयित रुग्णांची माहिती घेतली.