शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 12 मार्च 2020 (15:44 IST)

महाराजांची जयंती सणाप्रमाणेच साजरी झाली पाहिजे : राज ठाकरे

Maharaj's birth anniversary

महाराष्ट्रात ३६५ दिवस शिवजयंती साजरी झाली पाहिजे असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी राज ठाकरे औरंगाबादमध्ये आलेत.  यावेळी बोलताना त्यांनी महाराजांची जयंती एक सण तो त्याप्रमाणेच साजरा झाला पाहिजे असं सांगितलं.

शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार या वादावर बोलताना राज ठाकरेंनी सांगितलं की, “मी काही वर्षांपूर्वी जयंत साळगावकर यांच्याकडे गेलो होतो. त्यांना मी तेव्हा शिवजयंती तारखेनुसा साजरी करायची की तिथीनुसार असं विचारलं होतं. यावर त्यांनी सांगितलं की, ३६५ दिवस करायची. पण तिथीनुसार का याबद्दल सांगायचं झालं तर, आपण जे वर्षभर सण साजरे करतो ते तिथीनुसार करतो. कोणताच सण तारखेनुसार साजरा केला जात नाही. महाराजांची जयंती आपल्यासाठी एक सण आहे. त्यामुळे तो एका सणाप्रमाणेच साजरा झाला पाहिजे”.