रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: सोमवार, 10 फेब्रुवारी 2020 (11:28 IST)

Valentine Week : टेडी डे कसा साजरा केला जातो

टेडी डे Teddy Day  संपूर्ण जगभरात 10 फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो  
 
जोडपे आणि युवा व्हॅलेंटाइन आठवड्याच्या या सणाला फारच सुंदररीत्या साजरा करतात. या दिवशी लोक आपल्या आवडत्या लोकांना सुंदर टेडी (Teddy) गिफ्ट करून आपल्या प्रेमची जाणीव करून देतात.  
 
आपल्या प्रेमाची जाणीव करून देणारा टेडी आपली बायको, पार्टनर, नवरा आणि इतर आवडीच्या लोकांना देऊ शकतो. तसे तर मुलींना टेडी फार पसंत असतात आणि मुलांना देखील लोक टेडी बिअर गिफ्ट म्हणून देतात.  
 
लोक आपल्या आवडीच्या लोकांकडून गिफ्टमध्ये आलेले टेडी बिअर आपल्या बेडरूम आणि ड्राइंग रूममध्ये सजवून ठेवतात ज्याने ते नेहमी त्यांच्या आठवणीला आपल्या मनात ठेवू शतात. टेडी कोणाला आवडत नाही? प्रत्येक व्यक्ती टेडी आपल्या जवळ ठेवण्याची इच्छा ठेवतो कारण हे दिसण्यात फारच सुंदर असतात आणि प्रत्येकाच्या जीवनात आनंद घेऊन येतात.  
 
भले टेडीमध्ये जीव नसतो, त्यात हृदय देखील नसतो आणि कुठले आवाजही नसत पण तरी देखील त्यात भरपूर प्रेम असत. ते आपल्या जीवनात आवाज न करता भरपूर प्रेम आणि आनंद आणतात.