शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

सिंगल आहात? तर चला अहमदाबाद, या फॅकेत फ्री चहा पार्टी करा

फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा... या महिन्यात प्रेमाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे येतो. परंतू सिंगल असणार्‍यांना काय करावे? तसं तर सिंगल राहण्याचा मजा वेगळाच आहे ते प्रेमात एकमेकांचे नखरे झेलत असलेले लोकं सांगूच शकतात. तरी सिंगल असाल तर फ्री मध्ये चहा पार्टी करू शकता ते देखील व्हॅलेंटाइन डे ला.
 
MBA Chai Wala नावाच्या कॅफे अहमदाबाद येथील वस्तापुरमध्ये आहे. या कॅफेत एक इव्हेंट आयोजित केले गेले आहे ज्यात सिंगल्स फ्रीमध्ये चहा पिऊ शकतील. प्रफुल्ल बिल्लौरे या कॅफेच्या मालकाचे नाव आहे असून तो एमबीए ड्रॉपआऊट आहे.
 
फेसबुकवर देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे या कॅफेवर संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत मोफत चहा मिळेल. या कॅफेत चहाचे 35 प्रकार आहेत आणि बेस्ट फ्लेवर सिंगल्सला सर्व्ह करण्यात येईल. आपल्या इव्हेंटबद्दल बोलताना प्रफुल्लने सांगितले हे काम कठिण आहे परंतू मी सिंगल्सला भेटेन आणि बेस्ट फ्लेवर चहा पाजून त्याचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करेन.
 
प्रफुल्लने या कॅफेची सुरुवात अहमदाबादच्या एक गल्लीत 25 जून 2017 ला लाकडीच्या टेबलावर स्टॉलसह केली होती. त्यांचा संघर्षपूर्ण हा प्रवास केला. केवळ आठ हजार रुपये गुंतवणूक करून त्यांनी रस्त्यावर चहा स्टॉल सुरू केला तेव्हा नातेवाईक आणि सोसायटीचे बोलणे देखील खाल्ले परंतू मागे वळून बघितले नाही. हळू-हळू व्यवसाय चालू लागला आणि चहासोबत स्नेक्सदेखील सर्व्ह केले जाऊ लागले.
 
तर महायश आणि या व्हेलेंटाइनला सिंगल आणि परेशान असाल आणि अहमदाबादमध्ये असाल किंवा तेथे जाण्याचे इच्छुक असाल तर प्रफुल्लकडे चहा पिऊन या दिवस साजरा करू शकता. कारण व्हेलेंटाइनचं माहीत नाही परंतू चहा कधी धोका देता नाही.