सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

लग्नाच्या तिसर्‍या मिनिटाला घटस्फोट, नवर्‍याने असं काय म्हटलं...

कुवैतमध्ये एका नवरीमुलीने लग्नाच्या केवळ तीन मिनिटात घटस्फोट दिला. कुवैतच्या इतिहासात सर्वात लहान लग्न असे म्हटले जात आहे. 
 
कुवैत सिटीच्या एका कोर्टात लग्नासाठी वर- वधू आले होते. या दरम्यान वधू घसरून पडली. घसरल्यानंतर नवर्‍यामुलाने तिला स्टूपिड (मूर्ख) म्हटलं. ही गोष्ट मुलीला पसंत पडली नाही आणि नाराज होऊन तिने लग्नाच्या तिसर्‍या मिनिटाला घटस्फोट दिला. ज्या कोर्टात लग्नासाठी पोहचले होते तेथून तीन मिनिटात घटस्फोट घेऊन बाहेर पडले. सूत्रांप्रमाणे दोघांनी जजसमोर लग्नाच्या कागदावर सही केली होती.
 
तिथून बाहेर पडताना वधूचा पाय घसरला आणि ती धरपडली. या दरम्यान नवर्‍याने केलेल्या अपशब्दामुळे आघात पोहचला आणि तिने तिथेच घटस्फोटाचा निर्णय घेतला. 
 
या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक लोकांनी महिलेसाठी सहानुभूती दर्शवली आणि समर्थनात कमेंट्स केले
 
अनेक लोकांनी महिला योग्य वागली आणि योग्य निर्णय घेतला अशी प्रतिक्रिया दिली. लग्नाच्या सुरुवातीपासून नवर्‍याची अशी वागणूक असल्यास लग्न मोडणे योग्य असे ही लोकं म्हणाले. ज्यात सन्मान नाही असे नातं टिकू शकत नाही. असे कमेंट्स करून लोकांनी मुलीप्रती समर्थन दर्शवले.