चक्क, पाच लीटर पेट्रोल कॅनचा लग्नात आहेर
चेन्नई येथील कुड्डलूर या गावी एका विवाह सोहळ्यात चक्क एका नवरदेवाला लग्नातला आहेर म्हणून चक्क पेट्रोल भेट म्हणून मिळाल्याची घटना घडली आहे. नवदांपत्य रिसेप्शनसाठी उभं असताना नवरदेवाच्या मित्र मंडळींनी पाच लीटर पेट्रोलचा कॅन त्यांना आहेर केला. हे पाहताच सगळीकडे एकच हशा पिकला. नवरदेवाने या आहेराचा हसत हसत स्वीकार केला. तामिळनाडूत सध्या पेट्रोलचा दर ८५ रुपये लीटर इतका आहे. त्यामुळे आपल्या मित्राला देण्यासाठी या पेक्षा महागडा आहेर असूच शकत नाही, असा विचार करून मित्रांनी केला आहे.