कोव्हॅक्सिनबाबत WHO च्या निर्णयानंतरच दुहेरी लसीकरणाबाबत सुनावणी-सुप्रीम कोर्ट
कोव्हॅक्सिनची लस घेतलेल्या नागरिकांना कोव्हिशिल्ड या लशीचे दोन डोस देण्याच्या मागणीसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं सुनावणी केली.
याबाबत निर्णय देण्यापूर्वी जागतिक आरोग्य संघटना (WHO)भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशीला आपत्कालीन वापराची परवानगी देते का? याची वाट पाहणार असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे.
पूर्ण लसीकरण झालेल्यांना कोव्हिशिल्डची लस देण्याचा आदेश देऊन आम्ही लोकांच्या जीवाशी खेळू शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं.
कोव्हॅक्सिनची लस घेऊन परदेशी जाणाऱ्यांना तिथं विलगीकरणात राहावं लागत आहे. त्यामुळं त्यांना कोव्हिशिल्ड लस देण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती.
सरकारनं कोव्हॅक्सिनच्या लसीकरणापूर्वी WHO नं या लशीला परवानगी दिली नसल्याची बाब लपवली, असा आरोपही याचिकाकर्त्यांनी सरकारवर केला आहे