गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : गुरूवार, 24 सप्टेंबर 2020 (17:21 IST)

एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

Eknath Shinde
आता शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे संपर्कात आलेल्या लोकांना देखील स्वतःची कोरोना चाचणी करण्यासाठी आवाहन केले आहे. 
 
ट्विट करत ते म्हणाले की, 'मी माझी कोविड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशिर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोविड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती...'