'ऑक्सफर्ड'च्या लस चाचणीतून समाधानकारक निष्कर्ष

corona vaccine monkey
Last Modified शुक्रवार, 15 मे 2020 (16:32 IST)
करोना व्हायरसला रोखण्यासाठी ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातील जेनर इन्स्टिट्यूटने लस विकसित केली आहे. आतापर्यंत या लस चाचणीतून समाधानकारक निष्कर्ष समोर आले आहेत. ऑक्सफर्डच्या शास्त्रज्ञांनी एक महत्वाचा अडथळा पार केला आहे. माणसांप्रमाणे प्राण्यांवर करण्यात आलेल्या लस चाचणीचा निष्कर्ष आश्वासक आहे.

कुठल्याही नव्या आजाराशिवाय फुफ्फुसाचे नुकसान रोखण्यात “ChAdOx1 nCoV-19” लस परिणामकारक ठरली आहे. सहा माकडांना SARS-CoV-2 विषाणूचा डोस देण्यात आला. याच विषाणूमुळे जगभरात Covid-19 चा फैलाव झाला. या लसीच्या मानवी चाचणी कार्यक्रमात १ हजार स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.

तज्ज्ञांनी ऑक्सफर्डच्या लस चाचणीच्या निष्कर्षांचे कौतुक केले आहे. ज्या माकडांना करोनावरील ही लस देण्यात आली. त्यांना न्युमोनियाची बाधा झाली नाही असे डॉ. पेन्नी वॉर्ड यांनी सांगितले.
भारतातील पुण्याची सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया ही संस्था ऑक्सफर्डच्या लस संशोधन प्रकल्पात भागीदार आहे. सिरमने ऑक्सफर्ड विद्यापीठासह एकूण सात जागतिक संस्थांशी लस उत्पादनासाठी भागीदारी केली आहे. पहिल्या सहा महिन्यात ५० लाख डोस तयार केले जातील.
साधारण सप्टेंबर-ऑक्टोबपर्यंत ही लस बाजारात येईल पण त्यासाठी मानवी वैद्यकीय चाचण्या यशस्वी होणे गरजेचे आहे.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

बघा, निसर्ग चक्रीवादळाचा मार्ग कसा असेल?

बघा, निसर्ग चक्रीवादळाचा मार्ग कसा असेल?
3 जून दुपारी 4 वाजेच्या सुमारास : चक्रीवादळ अलिबाग येथून मुंबई किनारपट्टीवर, त्यानंतर ...

निसर्ग चक्रीवादळ: मुंबईतून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या ...

निसर्ग चक्रीवादळ: मुंबईतून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
निसर्ग चक्रीवादळ अलिबागजवळ किनारपट्टीला धडकण्याची शक्यता असल्याने ३ जून रोजी मुंबईहून ...

बिहारमधले सर्व क्वारंटाईन सेंटर बंद करणार

बिहारमधले सर्व क्वारंटाईन सेंटर बंद करणार
मात्र बिहारच्या नितीश सरकारने परराज्यातून येणाऱ्यांसाठी केलेले सर्व क्वारंटाईन सेंटर बंद ...

कोरोना लसीच्या चाचणीसाठी ३० माकडांची आवश्यकता

कोरोना लसीच्या चाचणीसाठी ३० माकडांची आवश्यकता
कोरोना विषाणूमुळे होत असलेला प्रादुर्भाव टाळण्यासाठी SARS COV- 2 ही लस तत्काळ विकसीत ...

आरोग्य विभागाचा विशेष उपक्रम, बिहार सरकारकडून मजुरांना मोफत ...

आरोग्य विभागाचा विशेष उपक्रम, बिहार सरकारकडून मजुरांना मोफत कंडोमचं वाटप
इतर राज्यांमधून आपल्या घरी परतलेल्या बिहारमधील कामगारांसाठी स्थानिक राज्य सरकारच्या ...