बुधवार, 10 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 18 एप्रिल 2020 (09:37 IST)

‘एलआयसी’चा हप्ता भरण्यास ३० दिवसांची मुदतवाढ

Extension of 30 days
करोना साथीच्या पाश्र्वभूमीवर भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) विम्याचे मार्च आणि एप्रिलमधील हप्ते भरण्यासाठी ३० दिवसांची मुदतवाढ दिली आहे.
 
महत्त्वाचे म्हणजे करोनामुळे विमाधारकाचा मृत्यू ओढवल्यास अन्य प्रकरणांप्रमाणेच भरपाईचा दावा प्राधान्याने स्वीकारून वारसाला भरपाईची रक्कम तातडीने दिली जाईल, असे शनिवारी जाहीर करण्यात आले. करोनामुळे झालेल्या मृत्यूमुळे आतापर्यंत १६ विमाधारकांच्या कुटुंबांना भरपाई देण्यात आली आहे.