गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 6 एप्रिल 2020 (12:38 IST)

ब्लॅक विडोची 'या' दिवशी रिलीज होणार

कोरोनामुळेअनेक उद्योगधंदे बंद झाले आहेत. हॉलिवूड इंडस्ट्रीवरही याचा परिणाम झाला आहे. कोरोनाचा जगभरातील कहर पाहता मार्वेल स्टुडिओजचा पुढील चित्रपट ब्लॅक विडोची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. आता मात्र, ब्लॅक विडोची नवी रिलीज डेट समोर आली आहे. 
 
अमेरिकेत ब्लॅक विडो १ मे रोजी रिलीज होणार होता. भारतात ३० एप्रिलला हा चित्रपट रिलीज होणार होता. कोरोना संक्रमणामुळे स्कारलेटच्या या चित्रपटाची रिलीज डेट पुढे टळली. नो टाईम टू डाय, अ क्वाईट प्लेस पार्ट -२ आणि मुलान यासारख्या हॉलिवूड चित्रपटांचीही रिलीज डेट कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. 
 
नवी रिलीज डेट जाहीर
ब्लॅक विडो ६ नोव्हेंबर, २०२० रोजी रिलीज होणार आहे. भारतात इंग्रजीशिवाय हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळममध्येदेखील ब्लॅक विडो चित्रपट रिलीज करण्यासाठी तयारी करण्याच येणार आहे.