शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 8 जुलै 2020 (10:11 IST)

सलग पाचव्या दिवशी तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले

राज्यात सलग पाचव्या दिवशी तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५४ टक्क्यांवर कायम असून ३२९६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण संख्या १ लाख १८ हजार ५५८ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ५१३४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ८९ हजार २९४ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
 
तपासण्यात आलेल्या ११ लाख ६१ हजार ३११ नमुन्यांपैकी २ लाख १७ हजार १२१ नमुने पॉझिटिव्ह (१८.६९ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ३१ हजार ९८५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ४६३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यात २२४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. राज्यातील मृत्यूदर ४.२६ टक्के एवढा आहे. राज्यात नोंद झालेले २२४ मृत्यू हे मुंबई मनपा-६४, ठाणे-७,ठाणे मनपा-१३, नवी मुंबई मनपा-२, कल्याण-डोंबिवली मनपा-१३, उल्हासनगर मनपा-५, भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा-भाईंदर मनपा-११, पालघर-२, वसई-विरार मनपा-८, पनवेल मनपा-९, नाशिक-४, नाशिक मनपा-९, अहमदनगर-१, धुळे-१, धुळे मनपा-१, जळगाव-५, जळगाव मनपा-३, पुणे-९, पुणे मनपा-२७, पिंपरी-चिंचवड मनपा-१, सोलापूर-३, सोलापूर मनपा-७, सातारा-१, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-४, जालना-२, लातूर-२, लातूर मनपा-१, उस्मानाबाद-१, यवतमाळ-२ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे तसेच इतर राज्य १ अशी नोंद आहे.