Motivational Story 3 डॉक्टरांची फीस  
					
										
                                       
                  
                  				  मी डॉक्टरांची फीस भरून नंबर लावला. 
	फीस भरल्याची पावती घेऊन रिसेप्शन हॉलमध्ये बसलो. 
				  													
						
																							
									  
	खरंतर ह्या डॉक्टरांची फीस जरा जास्तच आहे. 
	पण रुग्ण येत होते, नंबर लावत होते. 
	एक म्हाताऱ्या आज्जी रिसेप्शनिस्ट पर्यंत आल्या. 
				  				  
	त्यांच्या डोळ्यांत आशेची किरणं दिसत होती, पण डॉक्टरांची फीस ऐकून त्यांचा चेहरा पडला. 
	त्या त्यांच्या आजारी मुलाशी काहीतरी बोलल्या आणि दोघंही परत जायला निघाले. 
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	मी त्यांना थांबवलं आणि माझी पावती देऊ केली.
	"मला काहीही झालेलं नाहीये. मी इथे दरमहा नंबर लावून ही पावती एका गरजवंताला देतो. 
				  																								
											
									  
	याने मला महिनाभर कुठल्याच डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येत नाही."