बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020 (09:09 IST)

माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे उपचारांसाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये असंही आवाहन एकनाथ खडसे यांनी केलं आहे. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मी दाखल होणार आहे असंही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे. 
 
माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. गत ६ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची कोविड चाचणी करून घ्यावी हि विनंती. पुढील उपचारासाठी मी मुंबईला रवाना होत आहे. तुम्हा सर्वांच्या सदिच्छा माझ्या सोबत असल्याने मी लवकरच बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत असेल. आपण मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचार घेणार आहोत असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे.