सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020 (14:18 IST)

'14 नोव्हेंबर बाल दिवस मुलांचा दिवस'

दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी बाल दिवस साजरा केला जातो. या दिवशी स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांचा जन्म झाला होता. ते लहान मुलांवर खूप प्रेम करायचे. हे लक्षात घेऊन दर वर्षी त्यांचा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो.
 
पंडित नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद मध्ये झाले. नेहरूजींना मुलांशी प्रेम आणि जिव्हाळा होता. ते मुलांना भविष्याचे निर्माते समजायचे. मुलांसाठी त्यांच्या असलेल्या प्रेमामुळे मुलं देखील त्यांचा वर प्रेम करायचे आणि त्यांना चाचा नेहरू म्हणायचे. हेच कारण आहे की नेहरूजींचा वाढदिवस बाल दिवसच्या रूपात साजरा केला जातो.
 
14 नोव्हेंबरची तारीख नेहरू जयंती किंवा बालदिन म्हणून ओळखली जाते. हा संपूर्ण दिवस मुलांना समर्पित आहे. या दिवशी विशेषतः लहान मुलांसाठी शाळेत किंवा इतर संस्थानात विशेष कार्यक्रम आणि खेळांचे आयोजन केले जातात. 
 
मुलं हे देशाचे भविष्य आहे, ते त्या बियाणे प्रमाणे आहेत ज्यांना दिलेले पोषण किंवा संस्कार त्यांची वाढ आणि गुणवत्ता निर्धारित करतील. हेच कारण आहे की या दिवशी मुलांशी संबंधित शिक्षण, संस्कार त्यांचे आरोग्य, मानसिक आणि शारीरिक विकास अशा विविध विषयांवर चर्चा केली जाते.
 
बऱ्याच शाळा आणि संस्थांमध्ये बाल मेळावे आणि स्पर्धा आयोजित केल्या जातात, जेणे करून मुलांच्या क्षमता आणि प्रतिभेस आणखी प्रोत्साहन मिळू शकेल. 
 
या दिवशी विशेषतः गरीब मुलांना मूलभूत सुविधा पुरवणे आणि बाल श्रम आणि शोषण या सारख्या गंभीर बाबीवर देखील चर्चा केली जाते.
 
मुलं ही फार नाजूक आणि कोवळ्या मनाची असतात आणि प्रत्येक लहान गोष्ट त्यांचा मनावर आणि मेंदूवर परिणाम करते. त्यांचा आज हा येणाऱ्या उद्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. म्हणून त्यांचा क्रिया, त्यांना दिल्या जाणाऱ्या ज्ञान आणि संस्कारांवर विशेष लक्ष दिले पाहिजे. या सह मुलांची मानसिकता आणि आरोग्याची काळजी ठेवणं देखील महत्त्वाचे आहे. मुलांना योग्य शिक्षण, पोषण, संस्कार मिळावे हे राष्ट्राच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे कारण आजची मुले ही उद्याचे भविष्य आहे.