शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 14 जून 2021 (20:44 IST)

दिलासादायक बातमी : धारावीत कोरोनाचे एक ही रुग्ण नाही

संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान मांडले होते तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तर देशभरात उच्छाद मांडला होता. लाखो लोक मृत्युमुखी झाले.परंतु आता हळू हळू ही दुसरी लाट मंदावत असल्याची माहिती सगळी कडून येत आहे.

मुंबईकरांसाठीं या दुसऱ्या लाटे नंतर मोठी दिलासादायक बातमी येत आहे.त्या मुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी मानली जाणारी धारावी पहिल्यांदाच शुन्यावर आली आहे.गेल्या 24 तासात या भागात कोरोनाचे एक ही रुग्ण आढळले नाही. ही माहिती बीएमसी म्हणजे मुंबई महानगर पालिके ने दिली आहे.त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. 
 
कोरोनाच्या कालावधीत सर्वप्रथम याच परिसरात कोरोना व्हायरस ने थैमान मांडले होते. परंतु आता या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावत असल्याचे दिसत आहे.एवढ्या दिवसानंतर आज प्रथमच या भागात कोरोना बाधित एक ही रुग्ण आढळला नाही.
 
मुंबईत काल,रविवारी 700 कोरोनाबाधितांची नवीन प्रकरणे नोंदली गेली आणि 19 रुग्ण मृत्यूमुखी झाले होते. तर 704 रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. त्यानुसार रविवारी मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 7 लाख 16 हजार 579९वर पोहोचली आहे. यापैकी 15 हजार 183 रुग्ण मृत्यूमुखी झाले असून 6 लाख 83 हजार 382 कोरोनामुक्त झाले आहेत.