शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जानेवारी 2022 (20:57 IST)

मुंबईत, कोरोनाचे 11 हजार रुग्ण आढळले, दोघांचा मृत्यू

मुंबई मध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. सोमवारी मुंबईत 8 हजार 82 नवीन रुग्ण आढळले  आणि संसर्गाचा वेग आणखी वाढला आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 10 हजार 860 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यादरम्यान संसर्गाशी लढा देत असलेल्या दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. या नवीन प्रकरणांसह, आता शहरात कोरोना विषाणूचे 47 हजार 476 सक्रिय रुग्ण आहेत.
आज मुंबईत 654 लोक कोरोना संसर्गावर मात करून बरे झाले आहेत. त्यामुळे आता शहरातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 7 लाख 52 हजार 12 झाली आहे. आज नोंदवलेल्या एकूण संसर्ग प्रकरणांपैकी केवळ 834 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.