शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 7 ऑक्टोबर 2021 (08:46 IST)

राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 2,876 रुग्णांची नोंद, जाणून घ्या इतर आकडेवारी

राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. अजुनही दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत असून, कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनातून बरे (Recover Patient) होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. राज्यात बुधवारी 2 हजार 763 रुग्ण बरे झाले आहेत. तर 2 हजार 876 नवीन कोरोनाबाधित आढळले आहे.

राज्यात 90 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.राज्यात आजपर्यंत 1 लाख 39 हजार 362 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.सध्या राज्यातील मृत्यूदर  2.12 टक्के एवढा आहे.राज्यात आजपर्यंत 63 लाख 91 हजार 662 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.32 टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 96 लाख 19 हजार 637 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 67 हजार 791 नमुने पॉझिटिव्ह  आले आहेत.सध्या राज्यात 2 लाख 39 हजार 760 व्यक्ती गृह विलगिकरणात  आहेत.तर, 1 हजार 416 व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात  आहेत.राज्यात आज रोजी एकूण 33 हजार 181 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण  आहेत