सोमवार, 30 जानेवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (08:49 IST)

राज्यात८९२ रुग्णांची नोंद तर १६ जणांचा मृत्यू

राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात ८९२ नव्या रुग्णांची नोंद झाली असून १६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.गेल्या २४ तासात राज्यातील १ हजार ६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
 
राज्यात सध्या १४ हजार ५२६ इतकी सक्रिय रुग्णसंख्या असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९७.६ टक्क्यांवर पोहोचले आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घट होत असून राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका झाला आहे. राज्यात सध्या १,४८,७४३ व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर ९६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.