मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 29 जानेवारी 2022 (15:04 IST)

राज्यात तिसऱ्या लाटेचा पीक येऊन गेला असे म्हणता येऊ शकत : आरोग्यमंत्री

राज्यात काही भागात रुग्णवाढ कमी झाली आहे आणि काही भागात रुग्णवाढ होत आहे. पण त्याठिकाणी चिंता करण्यासारखे कारण नाहीये. त्यामुळे राज्यात तिसऱ्या लाटेचा पीक येऊन गेला असे म्हणता येऊ शकत, असे आरोग्यमंत्री  राजेश टोपे म्हणाले.
 
‘तिसऱ्या लाटेचा पीक येऊन गेलाय, असे म्हणता येईल. कारण आता मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या ठिकाणी मोठ्या संख्येत रुग्णवाढ होत होती. मात्र आता या ठिकाणी रुग्णवाढ कमी झाली आहे. पण राज्यात इतर भागात रुग्णसंख्या वाढतेय. म्हणजेच नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबाद अशा मेट्रो शहरात आणि ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढतेय. परंतु त्याठिकाणी चिंता करण्यासारखी परिस्थिती यासाठी नाही आहे की, सगळेजण ७ ते ८ दिवसांत बरे होत आहेत. त्यांना जास्त उपचाराची गरज पडत नाहीये,’ असे राजेश टोपे म्हणाले.