शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 8 जुलै 2020 (08:12 IST)

कोरोनावर लस येण्यासाठी अजून ६ महिने लागणार

सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी कोरोनावरची लस येण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी जाईल असं पूनावाला यांनी म्हटलं आहे. “सिरम इन्स्टिट्युटने ऑक्सफोर्डसोबत लस बनवण्यासाठी करार केला आहे. सध्या ऑक्सफोर्ड कडून लसीच्या मानवी चाचण्या सुरु आहेत. या चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्याचे निकाल आले की लस नेमकी कधी येणार यासंदर्भात आपण बोलू शकतो” असंही पूनावाला यांनी सांगितलं आहे.
 
कोरोनावर जी लस उपलब्ध करुन द्यायची आहे ती बाजारात आणण्याची घाई किमान आम्ही तरी करणार नाही. ही लस नेमका काय परिणाम साधते? तसेच ती किती सुरक्षित आहेत याची जोपर्यंत खात्रीलायक उत्तरं मिळणार नाहीत तोपर्यंत लस बाजारात येणार नाही. यासाठी पुढील सहा महिने लागू शकतात असंही पूनावाला यांनी म्हटलं आहे.