गुरूवार, 4 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (08:02 IST)

कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी घट, 2,432 नवीन रुग्णांची नोंद

Large drop in the number of corona infections
राज्यात कोरोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत सोमवारी मोठी घट झाल्याचे दिसत आहे. राज्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या तीन हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.तसेच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या कमी आहे.त्यामुळे राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे.राज्यात 2,432 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 2,895 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
 
राज्यात आतापर्यंत 63 लाख 62 हजार 248 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.26 टक्के आहे.तसेच आज दिवसभरात 32 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 38 हजार 902 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.
 
 सध्या राज्यात 37 हजार 036 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 82 लाख 86 हजार 036 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 41 हजार 762 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 57 हजार 144 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 1,517 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.