शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 2 मे 2020 (08:31 IST)

3 मे नंतर ग्रीन झोनमधील दारूची दुकानं आणि पान शॉप अटी अन् शर्तीवर उघडणार

liquor stores
कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून मोदी सरकारनं देशातील लॉकडाऊन 3 मे नंतर देखील 2 आठवड्यांसाठी वाढवला आहे. अशा परिस्थितीत ग्रीन झोनमध्ये काही सूट देखील देण्यात आली आहे. ग्रीन झोनमधील दारूची दुकानं आणि पान शॉप हे उघडणार आहेत मात्र त्यासाठी काही अटी व शर्तींचं पालन करणं गरजेचं आहे.

दुकानात एकाच वेळी 5 पेक्षा जास्त लोकं उपस्थित राहता कामा नये. तसेच सर्वांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागणार आहे. फक्त आणि फक्त ग्रीन झोनमध्येच ही सूट देण्यात आली आहे. त्यामुळे केवळ ग्रीन झोनमधील दारूची दुकानं आणि पान शॉप काही अटी व शर्तींवर उघडणार आहेत.